दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आता जिल्हा रुग्णालयात चकरा नकोत; वैद्यकीय महाविद्यालयात जावे लागणार
MH 28 News Live / बुलढाणा : दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाणाऱ्या दिव्यांग व्यक्तींसाठी महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील दिव्यांग तपासणी बोर्डाचे कामकाज ३१ ऑक्टोबर २०२६ पासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे दिव्यांग तपासणी आणि प्रमाणपत्र मिळविण्यासाठी राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बुलढाणा येथे संपर्क साधावा लागणार आहे.दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आता जिल्हा रुग्णालयात चकरा नकोत; वैद्यकीय महाविद्यालयात जावे लागणार
जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र वितरणाची संपूर्ण प्रणाली राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. यासाठी महाविद्यालयाला आवश्यक लॉगिन आयडी आणि पासवर्डही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात दर महिन्याच्या प्रत्येक बुधवार आणि शुक्रवारी होणारे दिव्यांग तपासणी बोर्डाचे कामकाज आता कायमचे बंद करण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, बुलढाणा यांनी माहिती दिली असून, दिव्यांग व्यक्तींनी प्रमाणपत्रासाठी यापुढे राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.