♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लोणारच्या मुलीला अश्लील मँसेज पाठवून आँनलाइन पाठलाग…. ‘ मजनू ‘ बनलेल्या फिरोजला सायबर पोलिसांनी केले गजाआड

MH 28 News Live, बुलढाणा : अनेक दिवसांपासून तो तिचा पिच्छा पुरवत होता. स्वतः चे नाव लपवून तो तिला मोबाईल फोनवरुन अश्लील पाठवून तिचा आँनलाइन करत होता. या सततच्या छेडखानीमुळे ‘ ती ‘ त्रस्त झाली होती. अखेर तिने सायबर पोलिसांकडे त्या लफंग्या मजनूची तक्रार केली आणि पोलिसांनी कसोशीने तपास करून त्या फिरोजला जालना जिल्ह्यातील तळणी येथून ताब्यात घेत गजाआड केले.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की; २६ वर्षे वयाचा फिरोज ताजमोहम्मद पठाण हा जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या तळणी येथील रहिवासी युवक लोणार येथील एका मुलीला + 1 (-705 ) 7138491 आणि + 1 ( 705 ( 809/3926 या आपल्या व्हर्च्युअल नंबरवरून Whatsapp द्वारे अश्लील चँटींग करत होता. शिवाय तो वेळोवेळी तिला आँनलाइन असल्याचे पाहून तिला शिवीगाळ करत लोणार येथे येण्याची धमकी देत होता. अशा प्रकारे हा मजनू सतत आपली छेड काढत असल्याने सदर तरुणी त्रस्त झाली, तिच्या मनात तो आपली अब्रू नुकसानी व बदनामी करेल अशी भीती निर्माण झाली. त्यामुळे तिने बुलढाणा येथील सायबर पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली. मिळालेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांनी भादंवि कलम ३५४ ( ड ), ५००, ५०४, ५०६, ५०७ व ५०९ सह कलम ६७ माहिती तंत्रज्ञान अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल केला होता.

दाखल गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक सारंगधर नवलकार, सायबर पोलीस स्टेशन बुलडाणा हे करीत होते. तपासामध्ये मिळालेल्या तांत्रीक व गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी फिरोज ताजमोहंमद पठाण, वय २६ वर्ष, व्यवसाय भुसार माल खरेदी विक्री, रा. विठठल मंदिरा जवळ तळणी ता. मठां जि. जालना याला तळणी ता. मंठा जि. जालना येथून ताब्यात घेतले. सदर कारवाई सारंग आवाड, पोलीस अधीक्षक, बुलडाणा, मा. श्री. बी. बी. महामुनी अपर पोलीस अधीक्षक, बुलडाणा यांचे मार्गदशनाखाली श्री. सांरंगधर नवलकार, पोलीस निरीक्षक, श्री. सुनिल साळुंके, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार रामेश्वर मुंढे, ज्ञानेश नागरे, भारत जंगले, पवन मखमले, केशव घुबे, राहुल इंगळे, राजु आढवे, कैलास ठोंबरे, अविनाष मुंढे यांनी केली आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सारंगधर नवलकार, सायबर पोलीस स्टेशन बुलडाणा हे करीत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129