
नगर परिषदेच्या डिजीटल सेवा प्रणालीचा शुभारंभ
MH 28 News Live, बुलडाणा : बुलडाणा नगर परिषद डिजिटल सेवा प्रणालीचा शुभारंभ आज दिनांक २१ मार्च रोजी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, उत्पादन शुल्क अधिक्षक भाग्यश्री जाधव, नगरपरिषद मुख्याधिकारी गणेश पांडे, ॲक्सीस बँकेचे आकाश जैन, कुणाल संजय गायकवाड प्रामुख्याने उपस्थिती एकनाथ गोरे, मो.सज्जाद, मुन्नाजी बेंडवाल, उदय देशपांडे तसेच सर्व नगरपरिषद कर्मचारी, नागरिकांची उपस्थिती होती.



