♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कोरोना अलर्ट : आज 05 पॉझिटिव्ह. 3 रूग्णांना मिळाला डिस्जार्ज

  • MH 28 News Live, बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 304 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 299 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 05 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड चाचण्यांमधील 05 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 101 तर रॅपिड टेस्टमधील 198 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 299 अहवाल निगेटीव्ह आहेत.

 

पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मोताळा शहर : 1, बुलडाणा तालुका : पांगरी 1, बुलडाणा शहर : सुदंरखेड 1, मलकापूर तालुका : धरणगांव 1, परजिल्हा : औरंगाबाद 1, अशाप्रकारे जिल्ह्यात 05 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती तीन रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.

 

त्याचप्रमाणे आजपर्यंत 802170 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 98238 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 98238 आहे. आज रोजी 96 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 802170 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 98970 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 98238 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 44 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 688 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129