♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जिल्ह्यात. संत चोखामेळा मंदिराचे करणार लोकार्पण; चिखली तालुक्यातील इसरुळ येथे होणार सोहळा

MH 28 News Live, चिखली : बुलढाणा जिल्ह्यात जन्मलेले वारकरी संप्रदायातील थोर संत चोखामेळा यांच्या मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दि. १२ मे रोजी जिल्ह्यात येत आहेत. चिखली तालुक्यातील इसरूळ येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

ह.भ. प पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या पुढाकारातून संत सेवा ट्रस्ट द्वारे संचालित महाराष्ट्राचे संत शिरोमणी श्री संत चोखोबरायांच्या मंदिरांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्या, दुपारी १२ वाजता संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री मुंबईवरून विमानाने छत्रपती संभाजीनगरला येतील. तिथून सकाळी ११वाजून ५० मिनिटांनी हेलिकॉप्टरने इसरुळकडे प्रयाण करतील. १२ वाजून १० मिनिटांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे इसरुळ येथील हेलिपॅडवर आगमन होईल. त्यानंतर मोटारीने ते श्री. संत चोखोबारायांच्या मंदिराच्या परिसरात जाऊन मंदिरांचे लोकार्पण करतील. दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129