♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ग्रामपंचायतने सील ठोकलेला गाळा कुलूप तोडून त्यांनी ताब्यात घेतला आणि फेसबुक लाईव्ह केले; मग डोणगावावात दाखल झाला दोघांवर गुन्हा

 

MH 28 News Live / डोणगाव : ग्रामपंचायतीने अधिकृत कारवाई करून सील केलेल्या दुकान गाळ्याचे सील व कुलूप तोडून तो अनधिकृतपणे ताब्यात घेतल्याच्या आरोपावरून दोघांविरुद्ध डोणगाव पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सील तोडतानाचा व्हिडिओ फेसबुक लाइव्ह करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याचेही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे

प्राप्त माहितीनुसार, डोणगाव ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक १२३ मधील दुकान गाळा क्रमांक १०३ हा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेतील २७ ऑगस्ट २०२६ रोजीच्या ठराव क्रमांक ९/१ नुसार सील करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार १९ सप्टेंबर २०२६ रोजी नामदेव फकीरा सातपुते (मयत) यांच्या दुकानाचा गाळा पंचांसमक्ष सील करण्यात आला होता.

दरम्यान, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारच्या सुमारास प्रशांत वानखेडे (वय ५०, रा. लोणी गवळी) आणि नरेन ओकारराव चव्हाण (वय २८, रा. डोणगाव) यांनी ग्रामपंचायतीने लावलेले सील व कुलूप तोडून दुकान गाळा ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ग्रामपंचायत अधिकारी विजय केशवराव दांडगे यांना दूरध्वनीद्वारे मिळाली.

फिर्यादीनुसार, संबंधितांनी सील तोडण्याची घटना मोबाईलद्वारे फेसबुक लाइव्ह केली. तसेच ‘Ramesh Chavan’ या फेसबुक खात्यावरून व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला. ग्रामपंचायतीला दुकान सील करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत दुकान गाळ्याचे नुकसान केल्याचा आणि ग्रामपंचायतीची बदनामी केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी विजय केशवराव दांडगे यांच्या फिर्यादीवरून प्रशांत वानखेडे आणि नरेन ओकारराव चव्हाण यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ आणि ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पुढील तपासाबाबत अधिकृत माहिती मिळणे अपेक्षित आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129