♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

एसडीके ऑटोमोबाईल्समुळे चिखलीत परिसरातील वाहनधारकांना मिळणार उत्कृष्ट सेवा ! दंडे परिवाराच्या भव्य आयशर शोरूम व सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन

MH 28 News Live / चिखली : बांधकाम व्यवसायात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या दंडे परिवाराने आता ऑटोमोबाईल क्षेत्रात पदार्पण केले आहे. चिखली येथे सुरू करण्यात आलेल्या एसडीके ऑटोमोबाईल्सच्या भव्य आयशर शोरूम व सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. या नव्या व्यावसायिक उपक्रमामुळे चिखली परिसरात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासोबतच वाहनधारकांना दर्जेदार सेवा व आधुनिक सुविधांचा लाभ मिळेल, असा विश्वास विद्याधर महाले यांनी व्यक्त केला.

उद्घाटनप्रसंगी बोलताना विद्याधर महाले म्हणाले की, एसडीके ऑटोमोबाईल्सच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच चिखली शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी, व्यावसायिक आणि मालवाहू वाहनधारकांना वाहनांची देखभाल, दुरुस्ती व अन्य आवश्यक सेवांसाठी स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांचा वेळ वाचण्यासोबतच त्यांच्या व्यवसायालाही मदत होईल.

यावेळी आयशरच्या कस्टमर केअर विभागाचे उपाध्यक्ष आतिश घोष यांनी कंपनीच्या ग्राहककेंद्रित दृष्टिकोनाविषयी माहिती दिली. आयशर कंपनी ग्राहकांच्या सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत असून, त्यांना तत्पर व दर्जेदार सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून चिखली येथे एसडीके ऑटोमोबाईल्सच्या माध्यमातून ग्राहकांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, सतीश कार्यदे, जेएमडी एमएसआयडीसीचे प्रतिनिधी गिरीश जोशी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश पांडुरंग नांदेडकर, राज्याचे पर्यावरण संचालक, अभय पिंपरकर, जिल्ह्याचे मुख्य प्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नव्हाडे, आरटीओ रघुवीरसिंह बिलावत, आयशरच्या कस्टमर केअर विभागाचे उपाध्यक्ष आतिश घोष, विभागीय व्यवस्थापक सुधीर कुमार, डीलर डेव्हलपमेंट विभागाचे डीजीएम, चॅनल सर्व्हिस मॅनेजर अकीब, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, भूषण चावडे, न्यू रेणुका हायब्रीड सीड्सचे संचालक सुनील मोडेकर, जिल्हा नियोजन व विकास समितीचे सदस्य कैलास भालेकर, माजी मुख्याध्यापक भाऊसाहेब सानप, अनंतराव नारळे, सुरेशअप्पा खबुतरे, पुरुषोत्तमराव देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज दंडे यांनी केले, तर पांडुरंग नांदेडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एसडीके ऑटोमोबाईल्सचे मार्गदर्शक पद्माकर दंडे यांच्यासह संपूर्ण दंडे परिवार आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. उद्घाटन सोहळ्याला चिखली शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी, व्यावसायिक, वाहनधारक तसेच दंडे परिवाराचे स्नेही व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दंडे परिवाराच्या या नव्या व्यावसायिक वाटचालीमुळे चिखलीच्या व्यावसायिक क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली असून, स्थानिक रोजगार आणि वाहनसेवांच्या दृष्टीने या उपक्रमाकडे अपेक्षेने पाहिले जात आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129