♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चारित्र्याच्या संशयातून संसाराचा रक्तरंजित अंत; पत्नीची गळा आवळून हत्या ! किनगाव राजा परिसरात खळबळ; आरोपी पतीला पोलिसांकडून

MH 28 News Live / किनगाव राजा : चारित्र्याच्या संशयातून उद्भवलेल्या कौटुंबिक वादाचे पर्यवसान भीषण हत्याकांडात झाले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत संतापलेल्या पतीने तिचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना किनगाव राजा येथे उघडकीस आली. संजीवनी दाभाडे असे मृत विवाहित महिलेचे नाव असून, संजय दाभाडे असे आरोपी पतीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून संजय आणि संजीवनी यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून वारंवार वाद होत होते. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये याच कारणावरून जोरदार भांडण झाले. या वादातून संतापलेल्या संजयने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी आरोपी पती संजय दाभाडे याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध हत्येसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेमुळे किनगाव राजा परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास किनगाव राजा पोलीस करीत आहे

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129