♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नवविवाहित तरुणीची लोणारमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

MH 28 News Live, लोणार : शहरातील पटेल नगर येथील नवविवाहित तरुणी मोहिनी संतोष भोसले वय १९ वर्ष हिने २५ एप्रिल ला दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान राहत्या घरातील एंगल ला ओढणी च्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली सदर मृतक तरुणी चे एक महिन्या पूर्वीच लग्न झाले होते पती शेतात गेले असता दुपारच्या दरम्यान तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक शरद आहेर पोलीस उपनिरीक्षक सूरज काळे चंद्रशेखर मुरडकर घटनास्थळी दाखल झाले व मृतकाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करून घरच्याना ताब्यात दिले. मृतक विवाहितेचा पती संतोष अनिल भोसले यांच्या फिर्यादीवरून लोणार पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद आहेर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सूरज काळे नितीन खारडे अनिल शिंदे हे करत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129