♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

डुलकी ठरली घातक… समृद्धीवर भीषण अपघात; झोपेने घेतला बळी

MH 28 News Live / मेहकर : समृद्धी महामार्गावर ट्रक चालकाला झोपेची डुलकी लागल्याने झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर क्लिनर किरकोळ जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. ४) पहाटे मेहकरजवळील चॅनेल क्रमांक २६९.४०० येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान नोंदणी क्रमांक आरजे-जीडी ४४१२ असलेला ट्रक समृद्धी महामार्गावरून जात असताना पहाटे सुमारे ३.५३ वाजता चालक लेकराज याला झोपेची डुलकी लागली. त्यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटून समोरील अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की ट्रकच्या पुढील भागाचा चुराडा झाला आणि चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात ट्रकमधील क्लिनर किरकोळ जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच मेहकरजवळील फरदापूर पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक सुनील सोळंके, सहायक पोलीस उपनिरीक्षक मंगेश खडसे तसेच पोलीस कर्मचारी निलेश राठोड, धीरज चंदन, मंगेश तंत्रे आणि गजानन जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी क्लिनरला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त वाहन हटवून समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. प्राथमिक तपासात चालकाला आलेली झोपेची डुलकी अपघातास कारणीभूत ठरल्याचे समोर आले असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129