
जिल्हा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अनिकेत मापारी यांची निवड; ६ हजार माताची आघाडी
- MH 28 News Live, लोणार : जिल्हा युवक कॉंग्रेस च्या अध्यक्ष पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत लोणार तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष राजेश मापारी यांचे सुपुत्र तथा युवा कार्यकर्तेअनिकेत मापारी यांनी सर्वाधिक मताधिक्य घेत विजय संपादन केला आहे. अनिकेत मापारी यांच्या विजयानंतर लोणार शहरात जिल्हा युवक कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
जिल्हा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत जिल्हा स्तरावर ही निवडणूक ऑनलाईन पद्धतीने ही निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये जिल्हाध्यक्ष पदासाठी अनिकेत मापारी आणि बुलडाणा येथील महेश ढगे यांच्यात सरळ लढत झाली होती. या निवडणुकीत जिल्हा युवक कॉंग्रेसच्या २७ हजार ८७९ कार्यकर्त्यांनी मतदान केले. यामध्ये अनिकेत मापारी यांनी प्रथम क्रमांकाची १० हजार ६८५ एवढी मते मिळवली तर महेश ढगे यांना दुसऱ्या क्रमांकाची ४ हजार २८७ मते मिळाली. अनिकेत मापारी यांच्या विजयामुळे पहिल्यांदाच लोणारला जिल्ह्याच्या अध्यक्ष पदाचे मान मिळाला आहे.
निवडणूक निकालानंतर अनिकेत मापारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपण युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाचे हात बळकट करणार असून काँग्रेस पक्ष जिल्ह्यातील युवकांना सोबत घेऊन काम करणार आहे, युवकांच्या माध्यमातून पक्ष मजबूत करण्याचे काम यापुढील काळात आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जेष्ठ कॉंग्रेस नेते साहेबराव पाटोळे, राजेश मापारी,अंबादास इंगळे, शेख समद, बादशाह सेठ, प्रा गजानन खरात, उबेद खान, गोपाल आखाड़े, संजय मापारी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



