
अतिक्रमणच्या जागेवर रमाई आवास योजना व पंतप्रधान घरकुल योजनेतील घरे बांधण्यास परवानगी द्यावी – रिपब्लिकन सेनेची मागणी
MH 28 News Live, चिखली : तालुक्यातील भरोसा या ठिकाणी नमुना ८ अ व नमुना ९ अ ग्रामपंचायत रेकॉर्ड ला अतिक्रम धारकांच्या नोंदी असून रमाई आवास योजना व पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ राहत्या जागेवर देण्यात यावा व त्या जागेचे कौल पट्टे देण्यात यावे या अनुषंगाने रिपब्लिकन सेनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दि. ८ मार्च रोजी निवेदन देऊन येत्या १० मार्चच्या आत भरोसा येथील ग्रामस्थांना रमाई आवास व पंतप्रधान योजनेचे घरकुल बांधण्यास परवानगी न दिल्यास व त्यांना त्या जागेचे कौल पट्टे नं दिल्यास येत्या १० मार्च रोजी रिपब्लिकन सेना जिल्ह्या भरआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई यांच्या नेतृत्वात जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्मा साळवे, जिल्हा कार्याध्यक्ष सलीम भाई, जिल्हा सल्लागार दीपक भाऊ जाधव, चिखली तालुका अध्यक्ष श्याम लहाने, तालुका कार्याध्यक्ष अमोल जाधव,तालुका संघटक अरुण जाधव,सागर जाधव, चिखली शहर अध्यक्ष सुनील सोळंके, उषाताई गवई, शालिनीताई सोनटक्के, अजय जाधव, अरुण फकीरबुवा जाधव यांच्यासह भरोसा येथील २० पुरुष लाभार्थी व २० महिला लाभार्थी निवेदन देण्यासाठी उपस्तिथ होते.



