रोजगार वार्ता – डाटा एंट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज करावे; १४ मार्च अखेरची मुदत. मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन
MH 28 News Live, बुलडाणा : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासन पुरस्कृत निलक्रांती, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना व राज्य शासनामार्फत योजना राबविण्यात येतात. तसेच मत्स्यबीज उत्पादन, मत्स्योत्पादन, सर्वेक्षण आदी प्रादेशिक व जिल्हा स्तरावरील माहितीचे संकलन करून सदर संकलित माहिती, आकडेवारी ऑनलाईन उपलब्ध करण्यासाठी अमरावती प्रादेशिक, अमरावती, बुलडाणा, वाशिम, अकोला व यवतमाळ जिल्हा कार्यालय स्तरावर तात्पुरत्या स्वरूपात डाटा एंट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे.
प्रत्येकी एक याप्रमाणे सहा पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. उमदेवारांनी अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात किंवा ईमेल द्वारे जिल्ह्याचे सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांचेकडे सादर करून एक प्रत प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय, अमरावती विभाग कार्यालयास १४ मार्च पर्यंत सादर करावे. उमेदवारांची १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय, अमरावती विभाग, अमरावती या कार्यालयात मुलाखत घेणार असून मुलाखतीस आवश्यक कागदपत्रांसह उमेदवारांनी उपस्थित रहावे. पदांचा कालावधी ११ महिन्यांचा असणार आहे. मासिक वेतन २५ हजार रूपये, वय १५ मार्च रोजी ३५ वर्षापेक्षा कमी असावे, पात्रता ही कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आहे. यामध्ये सांख्यिकी, संगणक व मत्स्यशास्त्र विषयात पदवीधर उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. एमएससीआयटी प्रमाणपत्र, संगणकीय ज्ञान, इंग्रजी व मराठी दोन्हीमध्ये किमान ३० शब्द प्रति मिनीट टायपिंग असावी. मोठ्या प्रमाणावर डेटा प्रोसेसिंग आणि व्यवस्थापन क्षेत्रात, सरकारी क्षेत्रातील किमान एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असावा. या पदाला कोणतेही शासकीय भत्ते मिळणार नाही. मुलाखतीस उमेदवाराला स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल. उमेदवाराने बायोडेटा, छायाचित्राचा ओळखीचा पुरावा, पत्याचा अधिकृत पुरावा, जन्म दिनांक नमूद असलेला वयाचा पुरावा, पदवी प्रमाणपत्र, पदवी अभ्यासक्रमामध्ये सांख्यिकी व संगणक विषय असल्याबाबत दस्ताऐवज, एमएससीआयटी प्रमाणपत्र, अनुभवाचे पुरावे अर्जासोबत सादर करावे. सर्व दस्ताऐवज सर्व स्वयंसाक्षंकित करावे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, बुलडाणा प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, धाड रोड, बुलडाणा येथे, संपर्क क्रमांक 07262-242254 व ईमेल आयडी pmmsy. buldhana@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button