
जिल्हा ग्रंथालय संघातर्फे बुलडाण्यात सत्कार संपन्न
MH 28 News Live, बुलडाणा : महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या नवनिर्वाचित अघ्यक्ष गजाननराव कोटेकर, वर्धा यांचा सत्कार बुलडाणा जिल्हा ग्रंथालय संघातर्फे दि. ३१ मार्च रोजी गर्दे वाचनालय, बुलडाणा येथे संपन्न झाला. कर्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी नगराध्यक्ष व गर्दे वातनालयाचे अघ्यक्ष गोकूल शर्मा, सचिव उदय देशपांडे, जिल्हा ग्रंथालय संधाचे अध्यक्ष, अध्यक्ष सातपुते, प्रदेशाघ्यक्ष सुनील वायाळ व्यासपीठावर होते..
या कार्य़क्रमाला जिल्हा भरातून ग्रंथालयीन कर्मचारी,चळवळीतले अग्रगंण्य अरुणाताई कुल्ली, गायकवाडसर, कुरेशी मेहकर, वासुदेवराव देशपांडे, जगदेव महाराज पवार, वाघसाहेब,आणि वाचक बहुसंख्येने उपस्थित होते. नरेंद्र लांजेवार, बाळासाहेब देशपांडे, श्रीमती कुल्ली यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नेमिनाथ सातपुते यांनी केले.



