
मद्यधुंद लहान भावाने मोठ्या भावाच्या शेतातील कांद्यावर फिरवला ट्रॅक्टर
MH 28 News Live, लोणार : तालुक्यातील गुंधा येथे भावाने शेतातील कांदा ट्रॅक्टरने उठून तीन लाखाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
गुंधा येथील नंदु काशीनाथ मानकर यांनी फिर्याद दिली की,गुंदा शिवारात गट क्रमांक ५५५ मध्ये अडीच एकर शेती असून शेतामध्ये एक एकर टोळ कांदा पेरला आहे लहान भाऊ गणेश काशिनाथ मानकर हा नेहमी वडलांनी नावावर केली शेती पाहिजे त्यावरून भांडण करत असतो. शेतापासून थोड्या अंतरावर विष्णुस्वामी यांची शेती बटाईने केली असल्यामुळे त्या शेतातील हरभरा काढणी साठी गेलो असताना,शेताकडे लोक जमलेली दिसली म्हणून शेतात जाऊन पाहले असता लहान भाऊ गणेश काशिनाथ मानकर हा दारू पिऊन आला व त्याने स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टर ने शेतातील कांदा वखरला यामुळे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. गणेश काशिनाथ मानकर यांनी शेतातील कांदा वखरुन लाख रुपयाचे नुकसान केल्याप्रकरणी लोणार पोलीस स्टेशनला अ.क्र. ६१ / २०२२ कलम ४४६, ४४७, ४२७ भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत असल्याची माहिती १२ मार्च रोजी देण्यात आली आहे.



