
शासकीय कंत्राटदार त्रासले ! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिले धरणे
MH 28 News Live, बुलडाणा : विदर्भ कंत्राटदार संघटना बुलडाणा जिल्हा कंत्राटदार संघटना, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना, बुलडाणा यांच्यातर्फे दि. १४ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. आपल्या प्रलंबित देयकांची रक्कम ३१ मार्चपुर्वी मिळावी याशिवाय अन्य मागण्या या आंदोलनाद्वारे शासकीय कंत्राटदारांनी शासनासमोर मांडल्या.
जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांनी राज्य सरकारची कोट्यवधी रुपये किमतीची कामे पूर्ण केली आहेत. या कामांची देयके देखील सादर केली आहेत. परंतु, यापैकी बहुतांश कामांच्या देयकाची रक्कम शासनाकडे अद्याप थकीत आहे. वेळोवेळी पाठपुरावा आणि अर्ज विनंत्या करून सुध्दा ही रक्कम मिळाली नाही. कामे पूर्ण करण्यासाठी उधार उसणवारी आणि कर्ज काढून शासकीय कंत्राटदारांनी पैसा उभारुन कामे पूर्ण केली..परंतु, देयकांची रक्कम प्राप्त न झाल्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
ह्याशिवाय सर्व कंत्राटात भावफरक कलमेचा समावेश करण्यात यावा, अतिरीक्त सुरक्षा ठेव कलम रद्द करणेबाबत निर्णय घ्यावा, बिड कॅपसिटीच्या कलमात सुधारणा केली जावी ह्या मागण्या देखील शासकीय कंत्राटदारांनी केल्या आहेत.
ह्या मागण्याकडे त्वरीत लक्ष वेधण्यासाठी आज धरणे आंदोलन आंदोलन आले.
उध्दवराव नागरे, संतोष पाटील, आश्रूवा शेवाळे, रवींद्रसिंग राजपूत, गणेश सवडे, विरतकुमार ठोसर, अक्षय नाईक, शेख सईद, अविनाश गायकवाड



