
होळी आली पण धान्य मिळेना; जळगाव जामोदमध्ये ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे धान्य वितरणात दिरंगाई
MH 28 News Live, जळगाव जामोद : तालुक्यात धान्य गोदामांमध्ये पुरेसे धान्य नसल्यामुळे तालुक्यातील धान्य दुकानदारांना धान्य पोहोचत नसल्याने कार्डधारकांना होळीच्या सणामध्ये धान्य कामात पडणार नाही व तसेच मागील दोन महिन्यापासून साखर सुद्धा या तालुक्यात नसल्यामुळे व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कार्डधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने तहसीलदार शितल सोलाट यांना आज १४ मार्च रोजी निवेदन देण्यात आले. तालुक्यासह शहरांमध्ये सुद्धा आज पर्यंत पुरेसा धान्य पोचला नाही व या महिन्यांमध्ये मका आणि ज्वारीचे वाटपात सर्व्हरमध्ये मागील दोन महिन्यांपासून बिघाड असल्याने दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जळगाव तालुक्यात शासकीय गोदामांमध्ये मका, ज्वारी तसेच साखर नसल्यामुळे दुकानदारांपर्यंत ठेकेदार धान्य पोहचवत नाहीत.
वास्तविक पाहता ही जबाबदारी सर्वस्वी ठेकेदाराची असल्यामुळे ठेकेदाराने मुदतीच्या आत धान्य पोहचते करणे गरजेचे असते.. तरी सुद्धा ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे स्वस्त धान्य दुकानदार व तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे शासनाने गंभीरतेने लक्ष द्यावे ह्यासाठी जळगाव जामोद प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.
यावेळेस संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर दाताळकर, कार्याध्यक्ष संजय देशमुख, दत्ता पाटील, अरुण पारवे, अरुण साबळे, शेख अकील, आर. ए. शेगोकार, आताऊल्ला खान, डी. बी. पाटील, शालिग्राम दाते यांच्यासह दुकानदार उपस्थित होते.



