
मोफत कर्करोग लसीकरण शिबीराच्या आयोजनातून साजरा होणार आ. श्वेताताई महाले यांचा वाढदिवस
MH 28 News Live, चिखली : भारतीय सिंधू सभा समर्पण दिनाचे औचित्य साधून आ. श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त २७ ते २९ मार्च दरम्यान गर्भाशयमुख कर्करोग लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात ९ ते १८ वयोगटातील मुलींना दोन लस तर १८ ते ४५ या वयोगटातील महिलांना दोन लस देण्यात येणार आहे. या लस १०० टक्के मोफत देण्यात येणार असल्याने मुली व महिलांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आधार बहुउद्देशीय संस्था, कॅन्सर पेशंट एड असोसिएशन, भारतीय सिंधू सभा महिला शाखा चिखली आणि चिखली मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
भारतात महिलांमध्ये आढळून येणाऱ्या कर्करोगामध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरवर्षी भारतात जवळपास १ लाख २५ हजार नवीन केसेसची नोंद होते व त्यापैकी जवळपास ७० हजार मृत्यू होतात. या कॅन्सरचे मुख्य कारण आहे.
जगात मागील १४ वर्षांपासून आतापर्यंत ३५० दशलक्ष व भारतात ५०० हजार स्त्रियांनी ही लस घेतलेली आहे. ही लस पूर्णत: सुरक्षित आहे. ही लस ९-४५ वर्षे वयोगटातील मुली व महिलांसाठी आहे. ९-१८ वर्षे वयोगटातील मुलीसाठी २ डोस पहिला डोस पहिल्या दिवशी, दुसरा डोस – ६ ते १२ महिन्यांच्या अंतराने १८-४५ वर्षे वयोगटातील महिलांना ३ डोस पहिला डोस पहिल्या दिवशी, दुसरा डोस २ महिन्यांच्या अंतराने आणि तिसरा डोस ६ ते १२ महिन्यांच्या अंतराने घ्यावा लागतो. गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून सर्वोत्तम संरक्षक आहे. बाजारात या लसीची किंमत ३ हजार रुपये आहे. मात्र शिबिरात ही लस पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे.



