♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

द कश्मीर फाइल्स चित्रपट करमुक्त करावा – योगेश राजपूत यांची मागणी

MH 28 News Network, बुलडाणा : कश्मीरमध्ये सन १९९० साली दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदुंच्या रक्तरंजित सत्य घटनेवर आधारीत इतिहासाचे चित्रण करणाऱ्या अतुल अग्निहोत्री निर्मित व अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पुनित इसार, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर, दर्शन कुमार यांचा मुख्य भुमिका असलेला “द कश्मीर फाइल्स” हा चित्रपट राज्यात करमुक्त करुन या चित्रपटाला चित्रपट गृह मिळवून देत संरक्षण द्यावे. जेणेकरुन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला हा चित्रपट अधिकाधिक पाहता यावा. अशी मागणी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत यांनी केली आहे.

भाजपा युवा मोर्चा बुलडाणा तालुका यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी रामनमुर्ती , बुलडाणा यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना द कश्मीर फाइल्स चित्रपट राज्यात करमुक्त करावा या मागणीसाठी निवेदन दिले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील, युवा मोर्चा जिल्हा संपर्कप्रमुख पद्मनाभ बाहेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस पंजाबराव धनवे व मंदार बाहेकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप उगले पाटील व विनायक भाग्यवंत, अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार, बुलडाणा नगरपालिका गटनेते अरविंद होंडे, युवा मोर्चा जिल्हा सचिव दत्ता शेवाळे, शहर सरचिटणीस अनंत शिंदे, युवा मोर्चा तालुका संपर्कप्रमुख सोपान जगताप, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सतीश पाटील व यश तायडे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रवीण गाडेकर, अमोल जाधव, गजानन सपकाळ, युवा मोर्चा सोशल मीडिया प्रमुख अभिषेक वायकोस आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129