♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खामगाव एमआयडीसीमध्ये बीएसएनएल कंपनीच्या भांडाराला लागली आग. मोठे आर्थिक नुकसान

MH 28 News Live, खामगाव : एमआयडीसी भागातील बीएसएनएल कंपनीच्या भांडार विभागाला आज १९ मार्च २२ रोजी सकाळी ८ ते ८.३० वाजेदरम्यान आग लागली होती व परिसरात वेगाने पसरली होती. ८.४५ वाजताच्या सुमारास अग्नीशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले होते. व १० वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले होते. यानंतर दुपारपर्यंत आग विझविण्यासाठी जवळपास १५ गाडी पाण्याचा मारा करण्यात आला होता व आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविले होते. अग्निशामक दलाचे अधिकारी नागेश रोठे यांच्या मार्गदर्शनात याहन चालक एस. डब्ल्यु. शिंदे व गोपाल फंदाट, ओम बोराखडे, वासुदेव तायडे, मोहन हागे, आर्दीनी परिश्रम करून आगीवर नियंत्रण मिळविले.

मिळालेल्या माहितीनुसार बीएसएनएल कंपनीचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले असून आगीमध्ये बीएसएनएलच्या भांडार गृहातील वेगवेगळ्या प्रकारच्या केबल जनरेटर बॅटया, टेलिफोन आदी साहित्य जळून भस्मसात झाले आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळावर पोहोचले होते. तर दुपारी १.३० वाजताच्या सुमारास बीएसएनएल कंपनीचे अधिकारी तक्रार देण्यासाठी शिवाजी नगर पोलिस स्टेशनला पोहोचले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी नुकसानीबाबत माहिती विचारली असता बीएसएनएल कं पनीच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापपर्यंत समोर आले

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129