♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे २८ मार्च रोजी आयोजन

MH 28 News Live, बुलडाणा : कृषि विभागाच्यावतीने २८ मार्च रोजी जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन जिजामाता महाविद्यालय क्रीडांगण, मोठी देवी मंदिराच्या मागे, बुलडाणा या ठिकाणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानाची माहिती मिळावी व शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाची विक्री व्हावी हा उद्देश या प्रदर्शनीचा असून या महोत्सवात शेतकऱ्यांना शेती क्षेत्रातील विविध तंत्रज्ञान, विज्ञान, योजना, मार्केटिंग इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच धान्य महोत्सवात आपण विविध प्रकारचे धान्य थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करू शकणार आहात. यामध्ये सेंद्रिय भाजीपाला, फळे, धान्य याचा प्रामुख्याने समावेश राहणार आहे. ही प्रदर्शनी सर्वांसाठी खुली असून सर्वांनी प्रदर्शनीस आवश्यक भेट देऊन शेतकऱ्यांकडील उत्पादीत सेंद्रीय माल खरेदी करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129