♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

गुन्हेगारांनो खबरदार…. चिखली पोलीसांची आता असेल शहरावर करडी नजर. ४० CCTV कँमेरे देणार जागता पहारा…

MH 28 News Live, चिखली : चिखलीकरांना दिलासा देणारी व बदमाशांच्या उरात धडकी भरवणारी एक महत्वाची बातमी आहे. चिखली शहर व चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी ठाणेदार अशोक लांडे यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून शहरातील चौकाचौकात व हम रस्त्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेरँची करडी नजर राहणार आहे. याद्वारे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचा ठाणेदार लांडे यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या या उपाययोजनेमुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसून नागरिकांचे जीवनमान अधिक सुरक्षित होण्याची शाश्वती निर्माण झाली आहे.

शहर व परिसरातील गुन्हेगारांच्या कृत्याला आळा बसण्याकरिता व शहरात होणाऱ्या चोऱ्या, घरफोडया, चैन स्नॅस्कींग यासारख्या गुन्हयाना व गुन्हेगारास आळा बसावा याकरिता चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक लांडे यांचे संकल्पनेतुन नगर परिषद चिखली मार्फत शहरातील बाजारपेठ, बाबुलॉज चौक, श्री छत्रपती शिवाजी महराज चौक, महाराणा प्रताप पुतळा परिसर, बसवेस्वर चौक, बेलजोडी चौक, सिध्द सायन्स चौक, खामगांव चौफुली, मेहकर फाटा, एमआयडीसी एरीया, साकेगांव रोड, जाफ्राबाद रोड, बुलडाणा रोड या ठिकाणी व शहरात प्रवेश करणा-या रस्त्यावर, मुख्य रहदारीचे ठिकाणी असे एकुण ४० सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) लावण्यात आले असुन सपुर्ण शहर सीसीटीव्ही कॅमे-यांचे (सर्व्हेलन्स खाली) निगराणी खाली आले आहे. सदर सीसीटीव्ही कॅमे-यांचे (CCTV) नियंत्रण कक्ष पोलीस स्टेशनला असुन त्यावर चिखली पोलीसांची करडी नजर राहणार असुन गुन्हयाना व गुन्हेगाराना आळा बसणार आहे.

त्यासाठी नगर पालीका प्रशासन व स्थानीक व्यापारी वर्ग तसेच एमआडीसी व्यापारी संघटना यांनी मोलाचे सहकार्य केले असून पुढील होणाऱ्या घटना चोरीच्या टाळण्यासाठी व गुन्हयांना आळा बसण्याकरिता, गुन्हेगांराची ओळख पटवण्यासाठी पोलीसांचा तिसरा डोळा म्हणजेच सीसीटीव्ही कॅमेरेच्याची अंत्यत मोलाची मदत होणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129