
कोरोना अलर्ट : आजहि कोरोना शुन्यावर आऊट; असे 53 वेळा घडले
MH 28 News Live, बुलडाणा : पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हा वासियांना आज 53 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 15 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणी द्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 401 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 401 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 79 व रॅपिड चाचणीमधील 322 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 401 अहवाल निगेटीव्ह आहेत.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 805200 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 98298 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 98298 आहे. आज रोजी 117 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 805200 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 99001 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 98298 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 15 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 688 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.



