
अखेर लोणारच्या तहसीलदारांनी केला ‘ त्या ‘ विटभटयांचा जाहीर लिलाव. ४ लाख २९ हजाराचा महसूल केला जमा
MH 28 News Live, लोणार : कोणत्याही प्रकारचा एन. ए. न करता व शासनाला अकृषक कर न भरता व्यवसाय करणा-या आस्थापनांवर अकृषक सा-याची आकारणी व त्याची वसुली करण्यात येत आहे. शासनाने दिलेले उद्दिष्ट मार्च २०२२ अखेर पुर्ण करावयाचे असल्याने महसूल विभागामार्फत मोहिम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत लोणार तालुक्यातील मौजे पळसखेड, हिरडव, जांबुळ शिवारात असणा-या अनधिकृत विटभटयावर लोणारचे तहसिलदार सैपन नदाफ यांनी आपल्या पथकासमवेत १७ मार्च रोजी कार्यवाही करून सदर विटभटटी मालक व शेतमालक यांना दिनांक २३ मार्चपर्यंत दंड भरण्याची मुदत दिली होती. परंतु, सदर विट भटटी मालक व शेतमालक यांनी सदर दंड विहीत मुदतीत न भरल्याने आज दिनांक २४ मार्च रोजी पळसखेड, हिरडव, जांबुळ येथील विटभटयांचा जाहीर लिलाव करण्यात आला.
अनधिकृत अकृषक वसुली मोहिमेअंतर्गत तहसिल कार्यालय लोणार यांचे मार्फत वसुली अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. सदर लिलावाची पुर्वसुचना व जाहीरनामा पुर्वी काढुन पुर्वसुचना संबधित गावामध्ये देण्यात आलेली होती. लिलावाचे वेळी मौजे हिरडव, पळसखेड व जांबुळ येथील विटटयांची एकुण • नोटीस दिलेल्या दंडाची रक्कम ही ३, ५५, १०४ रुपये होती. तर प्रत्यक्ष लिलावात सर्वोच्च बोली बोलुन ४, २९, हजार रुपयांना लिलाव कायम करण्यात येऊन चलान द्वारे सदर रक्कमेचा भरणा करण्यात करून लिलाव धारकांना विटांचा ताबा देण्यात आला. सदर कारवाईत मंडळ अधिकारी जयदेव येऊल हिरडव, सुलतानपूर, एस. वाय. इंगोले तलाठी हिरडव, सुलतानपूर व पळसखेड, तलाठी डी. बी. गावंडे, व्हि. पी. तुपकर महसूल सहाय्यक, भगवान मुसळे महसूल सहाय्यक व शिपाई पी. बी. मानवतकर हे सहभागी झाले होते.



