
चिखलीच्या ऋग्वेद साखरे ठरला राष्ट्रीय रोलबाँल स्केटिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मानकरी
MH 28 News Live, चिखली : अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय रोलबाँल स्केटिंग स्पर्धा २६ व २७ मार्च रोजी संपन्न झाल्या या स्पर्धेत चिखली चा खेळाडू ऋग्वेद साखरे याने महाराष्ट्र टिमचे नेतृत्व करत संघाला सुवर्णपदक मिळवुन दिले.
ऋग्वेद हा बुलडाणा रोलबाँल असोसिएशनचा खेळाडू आहे. रोलबाँल संघटनेने आपल्या जिल्हाचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्वल केले. हा खेळाडू केंब्रिज स्कुल बुलडाणाचा खेळाडू आहे. या खेळाडूला राष्ट्रीय प्रशिक्षक, पालक व स्केटिंग अकँडमी बुलडाणाचे संचालक देवानंद नेमाने यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल रोलबाँल खेळाचे जनक श्री. राजू दाभाडे, पगार सर, कोल्हे सर, वडवेराव महेश सर, नंदु पाटील तसेच जिल्हा सचिव माधव मंडळकर, क्रिडा अधिकारी अनिल इंगळे, शाळेचे प्राचार्य जगताप सर, लांडकर सर, साखरे सर, पळसकर सर, महाडिक सर, शंतनु बोंद्रे, अस्लम हिरीवाले, संदिप बिथरे, राम काछवाल यांनी खेळाडू व प्रशिक्षक यांचे कौतुक करुन सत्कार केला. ऋग्वेदने त्याच्या यशाचे श्रेय आई वडिलांना व राष्ट्रीय प्रशिक्षक तसेच महाराष्ट्र टिम कोच देवानंद नेमाने यांना दिले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button