
लोणार – किनगाव जट्टू रोडवर अपघात; एक युवक ठार
MH 28 News Live, लोणार ; भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. आज, ३१ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता लोणार किनगाव जट्टू रोडवर ही घटना घडली.
कार क्रमांक (एम.एच.३७ ए,३०९५) लोणारकडे येत असताना कारने दुचाकी क्रमांक (एम.एच.०५,८०६३) ला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार विनोद यशवंत मस्के (३७,रा. किन्ही) हा युवक जागीच ठार झाला.
घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेहास उत्तरीय तपासणीसाठी लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तपास लोणार पोलीस करीत आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button