♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्ताने देऊळगाव राजात निघाली मातृशक्तीची शोभायात्रा

MH 28 News Live, देऊळगाव राजा : हिंदू नववर्षानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन गुढी पाडव्याला करण्यात आले होते. सुखानंद स्वामी महाराज मठ दुर्गापुरा येथून निघालेल्या भव्य शोभायात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात युवती व महिला सहभागी झाल्या होत्या. मराठी संस्कृती व हिंदू परंपरा ही आदर्श जीवन संस्कृती समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न या शोभायात्रेतून करण्यात आला.

शहरातील प्रत्येक चौकामध्ये लेझीम प्रात्यक्षिक, ” भारत माता की जय ” ” वंदे मातरम “, ” जय श्रीराम ” या नावाने जय जय घोष करत आनंदमय वातावरणात भव्य शोभायात्रा पार पडली. वसंतराव पालवे जिल्हा सह मंत्री वि.हि.प व सूरज हनुमंते बजरंग दल बुलडाणा जिल्हा यांच्यासह शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी आशा शेळके, संगीत मोगरकर, रूपा अहिरे ताई, पल्लवी वाजपे, संध्या टोणपे, मोगल ताई, कल्पना तलबे मनीषा हनुमंते, माधवी तेलंग, कल्पना कुळकर्णी, रजनी चित्ते, मांटे ताई, कु आकांशा पंडित, कु प्रज्ञा गुलस्कर, कु श्रवणी व्याव्हरे, कु सुहानी खडकपूरकर, कु मिताली खरात, कु आकांक्षा लोहर, कु धनश्री शेळके आदींनी परिश्रम घेतले. दिनेश सोळंके यांच्या राजमुद्रा फिजिकल अकॅडमीमधील युवतींनी लेझीम पथककाचे विविध प्रात्यक्षिक व चित्त थरारक असे साहसी प्रयोग सादर केले. भारत माता आरती करून शोभायात्रेची सांगता करण्यात आली.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129