
बुलडाण्यात २७ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
MH 28 News Live, बुलढाणा : २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुलडाणा शहरातील सावित्रीबाई फुलेनगरात आज, ५ एप्रिलला सकाळी ११ च्या सुमारास घडली.
आकाश दिलीप सपकाळ (रा. सावित्रीबाई फुलेनगर, बुलडाणा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. तो मजुरीचे काम करत होता. सकाळी आई त्याला बघण्यासाठी आली असता पंख्याच्या कडीला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो दिसून आला. आईने शेजारील लोकांना बोलावले. शेजारील लोकांनी त्याला उतरवून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. शहर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात तीन भाऊ, आई आहे. तो अविवाहित होता.



