
संजय बियानी यांच्या हत्येच्या तपास सीआयडीकडे द्यावा; मेहकर येथील माहेश्वरी समाजाची मागणी
MH 28 News Live, मेहकर : नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची दि. ५ एप्रिलला भर दिवसात रस्त्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात सर्वत्र उमटले असून मेहकर येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी मेहकर यांना दि. ७ एप्रिल रोजी देण्यात आले.
संजय बियानी यांच्या हत्येसंबंधाने नांदेड पोलीसांनी अद्यापपावेतो या घटनेतील आरोपींना अटक करून कारवाई केलेली नाही. सदरील घटना ही अत्यंत अमानविय स्वरूपाची असुन एका निरपराधी सममजसेवकाची मारेकऱ्यांनी अमानुषपणे हत्या केली आहे. सदर मृत व्यक्ती हा घरातील कर्ता पुरुष होता. त्याच्या अकाली मृत्युमुळे बियानी कुटुंबावर दु : खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे या कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले आहे. एवढेच नव्हेतर त्याची अमानुषपणे हत्या केल्यामुळे त्याचे कुटुंब व माहेश्वरी समाज हा सुध्दा एका प्रतिष्ठीत व समाजसेवी व्यक्तीला मुकलेला आहे. अशा परीस्थितीमध्ये सदर प्रकरण हे अपवादात्मक परीस्थितीमधील असल्यामुळे सबंधीत घटनेशी संबंधीत मारेकऱ्यांना त्वरीत अटक करून योग्य पध्दतीने तपास करणे जरूरीचे आहे. जेणेकरून या समाजातील प्रत्येक व्यक्तीचा न्यायपालीकेवरील विश्वास हा वाढेल तसेच यापुढे कोणीही अशा प्रकारे अमानुष कृत्य करण्याचे धाडस करणार नाही. या हत्या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभाग अथवा स्वतंत्र विभागाकडे देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, गृह राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य, विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य, पालक मंत्री, नांदेड जिल्हा, जिल्हा पोलीस अधिक्षक नांदेड यांना या निवेदनाच्या प्रतिलिपी देण्यात आल्या आहेत. विजय तोष्णीवाल, निलेश लाहोटी युवा शरद लखोटीया, डॉ. गोविंदें झंवर, विनोद मानधना, डॉ. सुनील भराडे, गोविंद मुंदडा, अँड. ओ. पी. राठी,
अँड. एस. आर. लाहोटी, अँड. आर. एस. राठी, मदन मुंदडा, प्रमोद लाहोटी, सुनील भांगडीया, उमेश मुंदडा, रमेश मुंदडा, डॉ. पवन मंत्री आदींच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.



