
पालकमंत्री ना. डॉ. शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त संजय गांधी, श्रावणबाळ योजनेच्या सभेत चिखलीत ६०२ प्रकरणांना मंजूरी
MH 28 News Live, चिखली:
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्हयाचे पालकमंत्री ना.डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्षनात चिखली तालुका संजय गांधी निराधार समितीने बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीत चिखली तालुक्यातील श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेच्या तब्बल ६०२ प्रकरणांना मंजुरात देण्यात आली आहे.
नामदार डॉ. राजेंद्र शिगणे यांच्या वाढदिवसा निमित्त मोठया संख्येने लाभार्थ्यांच्या अर्जांना मंजुरात देण्यात आल्यामुळे नामदार शिंगणे यांचा वाढदिवस लाभार्थ्यांसाठी एकप्रकारे पर्वणीच ठरला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, या व इतर योजनांच्या समितीत्या तालुका निहाय नव्याने गठीत केल्या आहेत. दिनांक ३० मार्च रोजी चिखली तहसिल कार्यालयात संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेची सभा पार पडली. या सभेत संजय गांधी निराधार योजनेची १४२ तथा श्रावणबाळ योजने अंतर्गत ४६० अषा सुमारे ६०२ प्रकरणांना मंजुरात देण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष समाधान सुपेकर तर प्रमुख उपस्थितीमध्ये तहसिलदार अजित येळे, नायब तहसिलदार खाडे, नगर परिषदेचे इंगळे, प. स. विस्तार अधिकारी राठोड, विभागातील कर्मचारी ठाकुर यांच्यासह समितीचे सदस्य निलेष अंजनकर, रवी तोडकर, बाबुराव सोनुने, ज्योती चव्हाण, शेख रफिक, परमेष्वर सावळे, नामदेव सदार, प्रकाव चव्हाण आदींसह संबंधीत विभागातील अधिकारी व कार्मचा-यांची उपस्थिती होती.