♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

संत भूमीमध्ये रामनवमीनिमित्त हजारो भाविकांची गर्दी… ‘ श्रीं ‘ च्या मंदिरात साध्या पद्धतीने राम जन्मोत्सव साजरा

MH 28 News Live, शेगाव: धार्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या रामनवमीनिमित्त संत नगरी शेगाव शहरात 10 एप्रिल रोजी राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी गर्दी केली होती. तर श्री संत गजानन महाराज मंदिरा मध्ये अत्यंत साध्या पद्धतीने व मोजक्याच विश्वस्त व भाविकांच्या उपस्थितीमध्ये शुभमुहूर्तावर श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या शेगाव शहरात दरवर्षी रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे प्रशासनाच्या निर्देशानुसार श्री संत गजानन महाराज मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने व मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीमध्ये मंत्रोच्चारात परंपरागत पद्धतीने श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येतो कोट्यवधी भाविकांचे आराध्य असलेले श्री संत गजानन महाराजांची प्रभू श्रीराम हे आराध्य दैवत होते त्यामुळे श्री संत गजानन महाराजांच्या हयातीतच शेगावात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू करण्यात आलेली आहे. दर वर्षी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारताच्या विविध प्रांतांमधुन लाखो भाविक राम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी शेगावात येत असतात. शेकडो वर्षांची ही परंपरा कोरोना महामारी मुळे मागील दोन वर्षापासून खंडित झाली होती या वर्षी राज्य शासनाने जरी कोरोना प्रतिबंध उठविले असले तरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने १० एप्रिल पर्यंत भाविकांनी दर्शनासाठी ई- पास काढलेले असल्याने श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने राम जन्मोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात जागोजागी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाहेरगावावरून २० अधिकाऱ्यासह एकूण १३८ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129