♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नागपूर मडगांव नागपूर प्रतिक्षा एक्स्प्रेस साप्ताहिक रेल्वेसेवा आजपासून सुरु, शेगावला थांबा देण्याची प्रवासी संघटनेची मागणी

MH 28 News Live, शेगाव : विदर्भातील प्रवाशांना कोकण व विदर्भात येण्या-जाण्यासाठी मध्य रेल्वेने नागपूर मडगाव ही ट्रेन सुरू केली आहे. नागपूर ते मडगांव प्रतिक्षा एक्स्प्रेस या गाडीला शेगाव रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करावा अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे राष्ट्रीय रेल्वे संघटनेच्यावतीने करण्यात आली विदर्भातील जनतेला कोकणात जाण्यासाठी नागपूर मडगाव गाडी उपलब्ध झाली आहे.

     ०१२०१ नागपूर मडगाव नागपूर ही रेल्वेगाडी नागपूर रेल्वे स्थानकावरून १५.५० वा सुटेल व दुसर्‍या दिवशी मडगांव येथे १७.३० पोचणार आहे परतीच्या प्रवासाकरीता  ०१२०२ ही विशेष गाडी १० एप्रिल रोजी मडगांव स्थानकावरून २०.१५ वा सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २०.१० वा नागपूर येथे पोहोचेल.  या रेल्वेला वर्धा, धामणगांव, बडनेरा जं, अकोला जं,भुसावळ जं, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण जं, पनवेल जं, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग नगरी, कुडाळ रोड,सावंतवाडी रोड, थिवीम स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. ०१२०१/०१२०२ नागपूर मडगांव नागपूर     प्रतिक्षा एक्स्प्रेस थांबा शेगावला मंजूर झाल्यास शेगाव खामगाव बाळापूर चिखली नांदुरा या भागातील प्रवाशांना कोकण ला जाण्यासाठी सुविधा होणार आहे त्याचप्रमाणे रेल्वे विभागाला सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे. साप्ताहिक विशेष रेल्वे सेकंड सिटींग, वातानुकूलित व्दितीय वर्ग,तृतीय वर्ग वातानुकूलित वर्ग, शयनयान वर्ग पुर्णपणे आरक्षित ९ एप्रिल ते १२ जुन पर्यंत चालवण्यात येणार आहे.

या रेल्वे ला शेगाव रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करून ही गाडी कायमस्वरूपी सुरू करावी अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजकुमार व्यास, राष्ट्रीय सरचिटणीस  वैभव बहुतूले राष्ट्रीय संघटन मंत्री ओमकार मळगावकर, कल्याण सावंतवाडी रेल्वे समन्वय समिती मुंबईचे अध्यक्ष सुनिल उत्तेकर, प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष शेखर नागपाल,रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील राष्ट्रीय सरचिटणीस श्री वैभव बहुतूले, दापोली तालुकाध्यक्ष नागेश मयेकर, मंडणगड तालुकाध्यक्ष संदेश गांधी,पेण संपर्कप्रमुख हर्षद भगत, कुडाळ तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी, यांनी मध्य रेल्वेच्या रिजनल मॅनेजर श्रीमती ऋचा खरे यांच्याकडे केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129