
कोरोना अलर्ट : सावधान…! कोरोना कमबॅक करतोय… आज जिल्ह्यात आढळला एक पॉझिटिव्ह
MH 28 News Live, बुलडाणा : सुमारे एक महिन्यापूर्वी जिल्ह्याचा निरोप घेणारा आणि गेल्या पंधरा दिवसापासून भारतातून पूर्णतः गायब झाला असे वाटणारा कोरोना विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. आज बुलडाणा जिल्ह्यात एका कोरोना पॉझिटिव रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा आपल्या आरोग्याची खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 43 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 42 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपिड चाचणीमधील अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोग शाळेतील 11 तर रॅपिड टेस्टमधील 31 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 42 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव तालुका : नांद्री 1, अशाप्रकारे जिल्ह्यात 1 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत 808381 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 98314 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 98314 आहे. आज रोजी 13 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 808381 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 99004 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 98314 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचा उपचार घेत असलेला दोन रूग्ण आहे. तसेच आजपर्यंत 688 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.