
तज्ञांचे मार्गदर्शन व प्रभावी औषधोपचार हिचं आरोग्य संजीवनी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणेंचे प्रतिपादन
MH 28 News Live, देऊळगाव मही : वाढती व्यसनधिनता व धकाधकीच्या जीवनामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सर्वांनाच विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याने मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सर्वाना सातत्याने सोसावा लागत आहे. परंतु या आरोग्य शिबिरात विविध तज्ञांचे मार्गदर्शन व प्रभावी औषधोपचार सर्व घटकांना जीवन संजीवनी ठरणारा असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन चेके यांच्या संकल्पनेतून पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देऊळगाव मही येथील विजय शांती लॉन येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच लक्ष्मी रामकिसन म्हस्के, उपसभापती कल्याणी शिंगणे, गजानन पवार, समाधान शिंगणे, नितीन शिंगणे, उद्धव मस्के, रवी सेट कोटेचा राजू शिरसाठ, रामदास शिंगणे, राजेंद्र चित्ते, बळीराम शिंगणे, विष्णू बनकर, प्रमोद घोगे, ज्ञानेश्वर कोल्हे, रूपाली चेके, भरत पाटील, बनकर,रवींद्र इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या आरोग्य शिबिरात विविध विभागाचे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. यावेळी डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार करू योग्य मार्गदर्शन केले. दोन हजारहून अधिक रुग्णानी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी रजनी शिंगणे म्हणाल्या की, गजानन चेके यांनी यांनी कमी कालावधीत आरोग्य शिबिराचे चांगल्याप्रकारे नियोजन केले आहे. शिबिरासाठी डॉ. जे.पी. ताठे, डॉ. महेश दंदाले, डॉ. मंगेश वायाळ, राम पऱ्हाड यांचे सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वितेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स, परिचारिका, औषध विक्रेते, तसेच गजानन चेके मित्र मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गजानन चेके यांनी केले.