♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खामगावसह जिल्ह्यातील रेल्वे समस्या सोडवणार – रेल्वेमंत्री ना. दनवेंशी आ. फुंडकरांची सकारात्मक चर्चा

MH 28 News Live, खामगाव : खामगाव मतदार संघ तसेच जिल्ह्यातील विविध विषयांवर केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांचेशी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ. अँड आकाश फुंडकर यांची विस्तृत व सकारात्मक चर्चा झाली.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे दोन दिवसाआधी बुलडाणा दौऱ्यावर होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड फुंडकर यांनी त्यांचेशी खामगाव मतदार संघ तसेच बुलडाणा जिल्ह्यातील रेल्वे सेवा संदर्भात विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली. खामगाव रेल्वे स्टेशन जवळील रेल्वे गेट येथे अंडरपास करावा, मुंबई हावडा मुख्य रेल्वे मार्गावर वर्धा , अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा , भुसावळ, रेल्वे दरम्यान नवीन तिसरा मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. हा मार्ग शेगाव मार्गे खामगाव वाडी मार्गे नांदुरा टाकल्यास खामगाव औद्योगिक शहर मुख्य मार्गावर जोडल्या जाईल. त्यामुळे हा मार्ग खामगाव वाडी मार्गे जोडावा, शेगाव तालुक्यातील एकफळ आळसना या गावाला रेल्वे रुळला लागून असलेली आठशे मीटर जागेतून रस्ता टाकण्यात यावा अथवा सार्वजनिक बांधकाम विभागास परवानगी द्यावी, खामगाव रेल्वे स्थानक हे इंग्रज कालीन रेल्वे स्थानक असून जलंब जंक्शनला सिंगल लाईन जोडली आहे. मुबंई कलकत्ता जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचा थांबा जलंब असल्याने तसेच संपूर्ण जिल्ह्याचा अन्न धान्य पुरवठा , रासायनिक खते, सिमेंट , आधी वस्तू व माल खामगाव स्थानकावर येतो त्यामुळे खामगाव रेल्वे स्थानक तसेच माल धक्का विकसित करावा, कोरोना महामारी मुलळे जलंब सर्वच एक्सप्रेस चे थांबे बंद करण्यात आले आहे ते आता पूर्ववत सुरू करावे , विदर्भ पंढरी असलेल्या शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांचे समाधी दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. शेगाव स्थानकावर अनेक गाड्यांचा थांबा आहे, ओरन्तु अहमदाबाद- पुरी- नांदेड – अमृतसर- नांदेड-श्रीगंगानगर व्हाया खांडवा या एक्सप्रेसचा थांबा दिल्यास भाविकांना सोयीचे होईल,तसेच पूर्णा अकोला ही रेल्वे पॅसेंजर ही शेगाव ऐवजी अकोला पर्यंत वाढवावी या व इतर रेल्वे समस्या व मागण्यांबाबत विस्तृत चर्चा आ अँड फुंडकर यांनी केली. यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना रावसाहेब दानवे यांनी यांबाबत सकारात्मक बोलून या मागण्या व समस्या सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129