♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सेवा संकल्प प्रकल्पातून झाला मनोरुग्ण बेपत्ता

MH 28 News Live, अमडापूर : येथून जवळच असलेल्या चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ परिसरातील सेवा संकल्प या मनोरुग्ण व निराधार लोकांसाठी चालवल्या जाणाऱ्या सेवा प्रकल्पांमधून एक मनोरुग्ण बेपत्ता झाल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. यासंदर्भात अमडापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून या मनोरुग्णाला अमडापूर पोलीस शोध घेत आहेत

यासंदर्भात थोडक्यात माहिती अशी की, युवा सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार पालवे व आरती पालवे यांच्याद्वारे चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ शिवारामध्ये सेवा संकल्प प्रतिष्ठान या नावाने निराधार व मनोरुग्ण व्यक्तींसाठी सेवा प्रकल्प चालवला जातो. या सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून अशा व्यक्तींना सहारा देण्याचा व त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न पालवे दांपत्य आणि त्यांचे सहकारी करत असतात. याच प्रकल्पामधून 13 एप्रिल रोजी एक मनोरुग्ण बेपत्ता झाल्याची घटना घडली. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील संगम जळगाव येथील सखाराम उत्तम सदाफुले हे 52 वर्षांचे मनोरुग्ण सेवा संकल्प प्रतिष्ठानमध्ये राहत होते. दरम्यान दि. 13 एप्रिल रोजी दुपारच्या वेळेस सदाफुले हे अकस्मात बेपत्ता झाले. यापूर्वी देखील दोन ते तीन वेळेला सदाफुले असेच कोणालाही न सांगता सेवा संकल्प प्रतिष्ठानमधून बाहेर पडले होते, परंतु काही वेळानंतर ते परत आल्यामुळे या वेळेला देखील सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या सेवाधार्यांनी त्यांची काही काळ वाट पाहिली. परंतु, दिवस मावळून गेला तरीदेखील सदाफुले हे परत न आल्यामुळे त्यांची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. पळसखेड सपकाळ व आसपासच्या परिसरामध्ये शोध घेऊन देखील सदाफुले हे मिळून आल्यामुळे अखेरीस 15 एप्रिल रोजी अमडापूर पोलीस ठाण्यांमध्ये सेवा संकल्प प्रतिष्ठानचे सेवाधारी मयूर विलासराव इंगळे यांनी सखाराम उत्तम सदाफुले नामक मनोरुग्ण बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मनोहर सदाफुले यांचा वर्ण सावळा असून त्यांच्या डाव्या हाताचे मधले बोट बोट तुटलेले आहे. त्यांचे वय अंदाजे 52 वर्षे असून अंगात पांढरा सदरा व काळी पॅंट घातली आहे व खांद्यावर पांढरा रुमाल घेतलेला आहे. अशा प्रकारचे वर्णन असलेली मनोरुग्ण व्यक्ती कोणाला आढळल्यास त्यांनी सेवा संकल्प प्रतिष्ठानशी त्वरित संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले असून या प्रकरणाचा अमडापूर पोलीस तपास करत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129