♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लग्नात सूत्रसंचालन करणे जीवावर बेतले… आपले नाव न घेतल्यामुळे चिडलेल्या शिवसेना नेत्याने केला सूत्रसंचालक पत्रकाराच्या घरावर मोताळ्यात हल्ला

MH 28 News Live, मोताळा : येथील एका लग्नकार्यात संचालनादरम्यान आपले नाव न घेतल्यामुळे चिडलेल्या स्थानिक शिवसेना नेते शरद पाटील आणि त्यांचा मुलगा प्रवीण पाटील यांनी आज दि. १९ एप्रिलला सूत्रसंचालकाच्या घरावर प्राणघातक हल्ला केला.

यासंदर्भात थोडक्यात माहिती अशी की, मोताळा येथील माळी सर यांच्या घरच्या लग्नाचे संचलन लोकमतचे पत्रकार गणेश झंवर यांच्याकडे होते. सत्कार तथा आलेल्या मान्यवरांचा नामोल्लेख करतांना झंवर यांच्याकडून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले शरद पाटील यांचा उल्लेख अनावधानाने राहून गेला. परंतु पाटील यांना या गोष्टीचा इतका राग आला की, त्यांनी लग्नमंडपातच गणेश झंवर यांना “पाहून घेण्याची” धमकी दिली. त्यानंतर लग्न सोहळा आटोपून गणेश झंवर हे घरी परतले. ते घरी आल्यावर शरद पाटील आणि त्यांचा मुलगा प्रवीण यांनी झंवर यांच्या घरावर हल्ला केला. यावेळी प्रवीण पाटील यांच्यासोबत 4 ते 5 लोकही होते. लोखंडी रॉड तथा उत्तर शस्त्रे घेऊन पाटील पिता-पुत्राने झंवर यांच्या कुटुंबावर हल्ला केला.

या हल्ल्यात सूत्रसंचालनकर्ते पत्रकार गणेश झंवर आणि नगरसेविका अनिता कैलास झंवर यांच्यासह झंवर परिवारातील धनराज, वैभव, विवेक झंवर हे जखमी झाले आहेत. झंवर कुटुंबाने बोराखेडी पोलिसांमध्ये या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129