♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

” हमे ढूंडो मत हम भाग गये है ! ” असा आला Whatsapp मँसेज… चिखलीच्या यात्रेतून मेरा खुर्द येथील तीन युवक झाले बेपत्ता

MH 28 News Live, चिखली : चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त चिखली शहरामध्ये आलेले मेरा खुर्द येथील तीन युवक गेल्या चार दिवसापासून बेपत्ता झाले आहेत. या युवकांच्या नातलगांनी सर्वत्र शोधाशोध केली, परंतु ते कोठेही आढळून न आल्यामुळे अखेर चिखली पोलिसांमध्ये यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान बेपत्ता झालेल्या तिघांपैकी एका युवकाच्या व्हाट्सअप वरून ” हमे ढूंडो मत हम भाग गये है ” असा मॅसेज आल्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे.

याबाबतची थोडक्यात माहिती अशी की दिनांक 16 एप्रिल रोजी चिखलीचे ग्रामदैवत श्री रेणुका देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रा निमित्त मेरा खुर्द येथील तीन युवक येथे आले होते. युसुफ शहा निसार शहा ( २० ), सोहेल शहा सलीम शहा ( २१ ) आणि एजाज शहा खलील शाह ( २० ) अशी त्यांची नावे आहेत. तीनही युवक १६ एप्रिलला सायंकाळच्या सुमारास मेरा खुर्द येथून यात्रेसाठी चिखली कडे येण्याकरता निघाले. रात्री यात्रेमध्ये फिरले देखील; यात्रा पाहण्याकरता गेलेली मुले रात्री दहा-अकरा वाजता वाजेपर्यंत घरी परत येतील या अपेक्षेत असलेल्या घरच्यांची चिंता मात्र तेंव्हा वाढली जेव्हा रात्री बारा वाजून गेले तरी हे तीनही युवक घरी परतले नाहीत. त्यामुळे काळजीत असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी चिखलीकडे धाव घेतली. यात्रेदरम्यान त्यांनी संपूर्ण शहरांमध्ये या तीनही युवकांचा कसून शोध घेतला. परंतु ते कोठेही आढळून आले आले नाहीत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या तिघांकडीलही मोबाईल नंबर स्विच ऑफ येत असल्यामुळे नेमका त्यांचा पत्ताही कुठे लागेनासे झाला. या दरम्यान युसुफ शहा निसार शहा याच्या व्हाट्सअपवरून ” हमे धूंडो मत हम भाग गये है ” असा मेसेज आल्यामुळे या युवकांना नेमके पळवून नेले आहे ती ते स्वतः पळून गेले आहेत या तर्कवितर्कांना उधाण आले असून या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे.

युसुफ शहा निसार शहा वय 20 वर्ष राहणार मेरा खुर्द रंग गोरा, बांधा मजबूत, उंची पाच फूट, केस बारीक कापलेले व दाढी बारीक, अंगात पिवळ्या रंगाचे शर्ट ,व काड्या रंगाची जीन्स पॅन्ट ,पायात स्पोर्ट शूज सोबत मोबाईल लांब.9527201857/..
7822963780, इजाज शहा खलील चहा वय 20 वर्ष राहणार मेरा खुर्द . रंग गोरा ,बांधा सडपातळ, उंची पाच फूट चार इंच ,अंगात मोरपंखी कलरचे शर्ट, व काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, पायात स्पोर्ट शूज, सोबत मोबाईल 7821864732, 93255163, सोहेल शहा सलीम शहा वय 21 वर्ष राहणार मेरा खुर्द रंग गोरा बांधा मजबूत उंची पाच फूट केस बारीक कापलेले अंगात मोरपंखी कलरचे शर्ट व काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट पायात स्पोर्ट शूज सोबत मोबाईल 9146341431 असे या तिघांचे वर्णन आहे.

दि. १८ एप्रिल रोजी या प्रकरणी इब्राहिम शाह निसार शाह यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून एएसाय राजेंद्र काळे हे काम पाहात असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129