♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

घटस्फोटितेवर बलात्कार… गर्भवती महिलेच्या तक्रारीवरून आरोपीला अटक, २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. मलकापूर पांग्र्यातला प्रकार

MH 28 News Live, सिंदखेड राजा : तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील एका तरुणाने गरीबीचा फायदा घेत घटस्फोटित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवुन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याने ती घटस्फोटित तरुणी गर्भवती राहिली आणि घटस्फोटित तरुणी गर्भवती राहिली. त्या तरुणाने मात्र तो मी नव्हेच भूमिका घेत लग्नास नकार दिल्याने अखेर अत्याचारग्रस्त तरुणीने पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी शेख अन्सार शेख गफ्फार रा. मलकापूर पांग्रा यास पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, मलकापूर पांग्रा येथील शेख अन्सार याने गावातील एका तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यामुळे ती तरुणी गर्भवती राहिली. अश्या परिस्थितीत तिने लग्न करण्याची शेख अन्सार यांच्याकडे लग्नाची मागणी केली असता याने लग्नास नकार दिला. त्यामुळे शेख अन्सार शे गफ्फार याचेविरूध्द साखरखेर्डा पोलिसात दि. 19 एप्रिल चे रात्री तक्रार तक्रार दाखल केली. त्यावरून ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी कारवाई करत अन्सारला अटक केली असून त्याला सिंदखेडराजा न्यायालयाने 22 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे करत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129