
शिवऋषी आणि शिवसृष्टी विशेषांकाचे झाले प्रकाशन
MH 28 News Live, चिखली : आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर चिखली येथे साप्ताहिक विवेक आणि आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसृष्टी आणि शिवसृष्टी या विशेषांकाचे प्रकाशन २७ एप्रिल रोजी करण्यात आले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ना. वि. लोणकर, सदर विशेषांकाचे प्रकाशन एस. पी. एम. कॉलेजचे प्राचार्य सुभाष गव्हाणे, प्रमुख वक्ते अनंतराव कुळकर्णी हे लाभले होते.
यावेळी बोलताना प्रमुख वक्ते अनंतराव कुलकर्णी यांनी शिवऋषी बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेल्या छत्रपती शिवरायांच्या कार्याचा गौरव केला. शिवऋषी आणि शिवसृष्टी अंकामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवसृष्टीची संकल्पना मूर्त करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे महत्व विशद केले. छत्रपती शिवराय यांचे जीवन चरित्र जाणता राजा या महानाट्याच्या माध्यमातून जगभर बसवण्याचे पोहोचवण्याचे जे कार्य त्यांनी केले त्याचा आढावा प्रमुख वक्त्यांनी आपल्या उद्बोधनातून घेतला. शिवसृष्टीचे कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपल्या खांद्यावर येऊन ठेपली आहे असे प्रतिपादन कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंदराव आसोलकर, साप्ताहिक विवेक प्रतिनिधी यांनी केले. आदर्श प्राथमिक विद्यामंदिराचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.



