
सोशल मीडियावर सांभाळूनच वागा, सामाजिक सलोखा बिघडवाल तर होणार कायदेशीर कारवाई… चिखलीचे ठाणेदार लांडे यांनी काढली Whatsapp, Facebook युजर्स व गृप अँडमिन्सना उद्देशून नोटीस
MH 28 News Live, चिखली : सध्या महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे व हनुमान चालीसाचा वाद सुरू असताना या पार्श्वभूमीवर रमजान ईद व इतर धर्मीयांचे सण उत्सव साजरे होत असतानाच या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडून सामाजिक शांतता भंग होऊ नये याची खबरदारी चिखली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांनी घेतली आहे. लांडे यांनी एक नोटीस काढून शहरातील सर्व सोशल मीडिया युजर्सना व व्हॉट्सॲप आणि फेसबुक वरील ग्रुप ॲडमीनला खबरदार केले आहे. या नोटिशीमध्ये सामाजिक शांतता भंग करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सोशल मीडिया यूजर्स व ग्रुप ॲडमिन च्या विरोधात कारवाई कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ठाणेदार लांडे यांनी दिला असून शासनाच्या निर्देशाचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
आपल्याला प्राप्त असलेल्या क्रिमीनल प्रोसिजर कोड सन १९७३ चे कलम १४९ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये ठाणेदार अशोक लांडे यांनी ही नोटीस बजावली आहे. सध्या महाराष्ट्रात भोंगे व हनुमान चालीसा महाआरती याकारणावरुन काही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेस बाधा घालणाऱ्या घटना घडत आहेत. काही समाजकंटका कडुन सदर घटने संदर्भात Whatsapp / Facebook/Twitter/Insragram / Telegram इत्यादी तत्सम मॅसेजींग अप्लीकेशन माध्यमाव्दारे आक्षेपार्ह फोटो, मॅसेज, व्हिडीओ क्लीप प्रसारीत केल्या जात आहेत. या संबंधाने चिखली शहर व परीसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहुन शातंता कायम टिकुन रहावी याकरीता आपणास याव्दारे कळविण्यात येते की, आपण ग्रुपचे अॅडमीन म्हणून काम पाहात आहात आपण व्हाटसअॅप ग्रुप मध्ये कोणकोणत्या व्यक्तीला समाविष्ट करु शकता याबाबत सर्व अधिकार आपणास असुन सदर व्हाटसअॅप ग्रुप मध्ये कोणते संदेश, फोटो, व्हिडीओ क्लीप येतात किंवा पाठवील्या जातात याबाबत आपणास पुर्ण कल्पना असते. तसेच आपण स्वतः Whatsapp/FacebookITwitter / Instagram / Telegram इत्यादी तत्सम मॅसेजींग अप्लीकेशन माध्यमे वापरत आहात. त्यामुळे आपले ग्रुप मधुन कोणीही आक्षेपार्ह Message, Audio, Picture, Video, Banner, Poster धार्मिक स्थळ फोटो त्यावर झेंडे विटंबनासारखे किंवा यापुर्वी घडलेल्या घटना पुन्हा प्रकाशीत करणे त्या आजच घडले आहे असे भासविणे, धर्माविषयी अपप्रचार, शब्दिक व लिखाणातुन अपप्रचार करणे, बुल्डोजर, घर पाडणे किंवा अन्याय अत्याचार समाजावर करत आहे असे दुप्रचार लेख प्रसिध्द करणार नाही.
कोणत्याही युजरने Social Media चे माध्यमातुन अफवा अपप्रचार व भिती निर्माण होईल अशी प्रतीक्रीया Whatsapp / Facebook/Twitter/Insragram / Telegram इत्यादी तत्सम मॅसेजींग अप्लीकेशन माध्यमाव्दारे प्रसारीत करु नये तसेच आपण आपले Whatsapp / Facebook/Twitter/Insragram / Telegram इत्यादी तत्सम मॅसेजींग अँप्लीकेशन ग्रुपवर या वैयक्तीक आकाऊडंवर आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ क्लीप व्हायरल करु नये. आपले Whatsapp / Facebook/Twitter/Insragram / Telegram इत्यादी तत्सम मॅसेजींग अँप्लीकेशन ग्रुपवर या वैयक्तीक आकाऊडंवर आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ क्लीप कोणी पाठविली तर आपण ती पुढे फारवर्ड करु नये जागेवरच ब्लॉक करावे तसेच ज्यांनीही आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ क्लीप पाठवीली त्याचे नाव मो. नंबर पोस्टे. चिखली येथे वेळीच कळवावे. आपण आपले ग्रुपमधिल सर्व सदस्यावर ग्रुपमध्ये कोणतेही धार्मिक सामाजीक तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ क्लीप अथवा मॅसेज टाकु नयेत याबाबत सर्व सदस्याना अवगत करावे. असे आवाहन ठाणेदार लांडे यांनी केले आहे.
सर्व व्हाटसअँप ग्रुप मधील सर्व सदस्यांना पूर्व सुचना द्याव्यात. आपले व्हाटसअँप ग्रुपमधील सदस्य किंवा आपण आक्षेपार्ह संदेश फोटो, विडीओ क्लीप फॉरवर्ड केल्याचे कृतीमुळे काही अनुचित प्रकार घडुन शहरात, गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप मधिल सदस्य तसेच ग्रुप अँडमीन यांचे विरुध्द प्रचलित अधिनियम, प्रचलीत सर्व कायदे/नियम/परिपत्रके यानुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच सदरची नोटीस ही आपले विरुध्द न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. तसेच सध्या जिल्हयात जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे आदेशानुसार कलम ३७ (१) (३) महा. पोलीस कायदा जमावबंदी लागू आहे याची देखील सर्वांनी नोंद घ्यावी असे ठाणेदार अशोक लांडे यांनी या नोटीसीमध्ये नमूद केले आहे.