♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हनुमान मंदिर पाडणाऱ्या मुख्याधिकारीला निलंबित करा – आ. अँड. फुंडकर

MH 28 News Live, खामगाव : हनुमान मंदिर तोडणाऱ्या बुलडाणा नगर परिषद मुख्याधिकारी यांचेवर तातडीने कारवाई करून निलंबित करा अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ. अँड. आकाश फुंडकर यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी बुलडाणा शहरातील जुने गावातील गजानन टॉकीज जवळील हनुमान मंदिर नगर पालिकेच्या वतीने पाडण्यात आले. या मंदिराचे जागी जिवाजी महाले यांचा पुतळा बांधण्यात अडचण असल्याचे करण देत हे मंदिर पाडण्यात आले. वास्तविक पाहता या मंदिराची कोणतीही अडचण नव्हती. या मंदिराला लागून खूप मोठी मोकळी जागा आहे. हे मंदिर न पाळता सुद्धा सहजरित्या पुतळा उभारण्यात येऊ शकतो. जिवाजी महाले यांचा पुतळा उभरायलाच हवा त्याला कोणाचाही विरोध नाही, परंतु हे मंदिर पाडण्याची काहीच गरज नव्हती. हे मंदिर अनेक वर्षांपासून होते. अनेक हनुमान भक्त येथे मनोभावे पूजा अर्चा करीत असत. या मंदिरामुळे कधीही कोणतीही सामाजिक तेढ निर्माण झाली नाही तरीही न प ने हे मंदिर पाडले. उलट पुतळ्याजवळ हे मंदिर अधिक शोभले असते, हनुमानाच्या दर्शनासह बांधवांनी जिवाजी महाले यांनाही अभिवादन केले असते. या कारवाईचा विडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. त्यामुळे या हिंदूविरोधी कारवाई मुळे जिल्ह्यातील हनुमान भक्त नाराज झाले असून त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. येत्या आठवड्यात 3 मे ला हिंदूंचा अक्षय तृतीया व मुस्लिम बांधवांची पवित्र रमजान ईद आहे, अशात सदर कारवाई करून न प ने जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तातडीने न प मुख्याधिकारी यांचे गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे, व मंदिर पुनर्निर्माण करावे अशी मागणी आ. अँड फुंडकरांनी केली आहे. कारवाई न केल्यास हिंदू संघटने सोबत भाजप तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही आ अँड फुंडकर यांनी दिला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129