
३ मे रोजी जागृत म्हसोबा ठाणे येथे महाआरतीला उपस्थित राहा – मनसे उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार
MH 28 News Live, चिखली : संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ०३ मे २०२२ रोजी अक्षय तृतीया चे शुभमुहूर्तावर राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरतीचे आयोजन करण्यात आलेले असून उद्या सायंकाळी ७ वाजता चिंच परिसर येथील श्री. जागृत म्हसोबा ठाणे या ठिकाणी मनसेच्या वतीने मनसे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष गणेश बरबडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. तरी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील हिंदू माता बंधू भगिनींनी यांनी महाआरती साठी अवश्य उपस्थित राहावे. असे आवाहन उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, तालुकाध्यक्ष विनोद खरपास यांनी केले आहे.



