आ. फुंडकरांच्या प्रयत्नांना यश, खामगाव जलंब रेल्वे पॅसेंजर सुर. आ. ॲड आकाश फुंडकरांनी दाखवली हिरवी झेंडी
MH 28 News Live, खामगाव : आ. अँड आकाश फुंडकर यांच्या मागणीनंतर आज पासून खामगाव जलंब रेल्वे पॅसेंजर सुरू झाली. कोरोना काळात खामगाव ते जलंब रेल्वे पॅसेंजर बंद करण्यात आली होती. अजूनही काही मेल, एक्सप्रेस, सवारी गाड्या जलंबला थांबत नाहीत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर असताना भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाशदादा फुंडकर यांनी त्यांचेकडे विविध मागण्या रेल्वे संदर्भात केल्या होत्या. त्यापैकी खामगाव जलंब रेल्वे पॅसेंजर सुरू करण्याची महत्वाची मागणी होती ती आज 4 मे रोजी पूर्ण झाली.
आज पासून खामगाव जलंब ही रेल्वे पॅसेंजर पुन्हा सुरू झाली आहे. जलंब ला अजूनही हावडा मेल सह अजूनही 9 एक्सप्रेस गाड्या थांबत नाहीत, त्यासुद्धा लवकर थांबा सुरू कराव्या. तसेच विद्यार्थी यांच्या सोयीसाठी पुन्हा खामगाव जलंब रेल सुरू करावी यासाठी सुद्धा आ. फुंडकरांनी केंद्रीय रेल्वे मंत्री ना.रावसाहेब दानवेंशी याबाबत चर्चा व पाठपुरावा केला. त्यानंतर उपरोक्त़ मागणी मंजूर करण्यात येऊन आज सकाळी आ. फुंडकर यांनी रेल्वे पॅसेंजर ला हिरवी झेंडी दिली, त्यानंतर स्टेशन मास्तर श्री अनासने यांचेशी विस्तृत चर्चा केली व नियमित मेल एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यानुसार खामगाव येथून रेल्वे पॅसेंजर तसेच रेलबस पूर्वीव्रत सोडव्या अशी सूचना केली. तसेच जलंब येथे तिकीट खिडकी सुरू करावी व आरक्षण खिडकी सुद्धा सुरू करावी अशी मागणीही आ फुंडकर केंद्रीय मंत्री ना रावसाहेब दानवे साहेब यांचे कडे करणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी रेल्वे चालक व प्रवाश्यांचे आ फुंडकर यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी भाजप पदाधिकारी व प्रवाशी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button