
महाविकास आघाडी सरकारकडुन पांदन रस्तेेे निर्मीती चळवळीचे कलशारोहन – २५ कामांना तब्बल ६ कोटी २५ लक्ष रूपयाचा निधी, माजी आमदार बोंद्रे यांच्या प्रयत्नांना यश
MH 28 News Live, चिखली : विधानसभा मतदार संघात सुरूवातीच्या काळापासुन शेत रस्ते व पांदन रस्ते निर्मीतीची चळवळ माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी शेतकरी व लोकसहभागातुन उभारली होती. रस्ते विकासाच्या धमण्या असुन शेतातील पांदन रस्ते मुख्य रस्त्याला जोडल्या जात आहेत. चिखली मतदार संघातील माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी सरकारकडे प्रस्तावीत केलेल्या पांदन रस्त्या पैकी २५ पांदन रस्ते निर्मीतीला महाविकास आघाडी सरकारचे रोजगार हमी योजना मंत्री ना. संदिपान भुंमरे यांनी कोटयावधी रूपयाच्या कामांना मंजुरात दिली आहे. यापुर्वी सुध्दा महाविकास आधाडी सरकारने रस्ते निर्मीतीसाठी कोटयावधी रूपयांचा भरगोस निधी मंजुर केलेला असुन त्यात नव्याने या कामांची भर पडली आहे. पांदन रस्ते निर्मीती चळवळीला महाविकास आघाडी सरकारकडुन मोताश्री ग्रामसमृध्दी शेत/पांदन रस्ते योजने अंतर्गत मंजुरात मिळाल्याने एकप्रकारे पांदन रस्त्यंाचे कलषारोहन महाविकास आघाडी सरकारकडुन होत असल्याची माहिती बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी दिली आहे.
पांदन रस्ते शेती विकासाच्या रक्त वाहिन्या आहे, याचे शेतक-यांच्या जिवनातील अनन्य महत्व लक्षात घेवुन माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी गेल्या दषकात प्रषासकीय अधिका-यांना सोबत घेवुन शेतकरी व लोकसभागातुन शेत व पांदन रस्ते निर्मीतीसाठी लोकचळवळ उभी केली होती. या रस्ते निर्मीतीच्या चळवळीतुन चिखली विधानसभा मतदार संघातील बहुतांषी गावामधील शेत रस्ते व पांदन रस्त्यांचे प्रष्न मार्गी लागले आहेत. पांदन रस्ते निर्मीतीतुन शेतक-यांना विकासाच्या वाटा मोकळया झाल्या असुन शेतक-यांचे जिवनमान बदलण्यास व आर्थीक दृष्टया सक्षम करण्यास पांदन रस्ते कारणीभूत ठरू पाहत आहे. याच धर्तीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांसाठी वरदान ठरणारी मातोश्री ग्रामसमृध्दी / शेत पांदन रस्ते योजना आमलात आनली. या योजने अंतर्गत दि. २९ मार्च रोजी शासन निर्णय देण्यात आला असुन या योजने अंतर्गत माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी सरकारकडे चिखली मतदार संघातील प्रस्तावीत केलेल्या २५ पांदन रस्त्याच्या कामांसाठी तब्बल ६ कोटी २५ लक्ष रूपयाचा निधीला मंजुरात दिली आहे. यात जवळपास २५ कि.मी. लांबीच्या पांदन रस्ते कामात खोर येथील टॉवर ते रामचंद्र पांडे शेत रस्ता, पिंपळगांव सराई येथील पिंपळगांव सराई पांदन रस्ता, सावरगांव डुकरे येथील आनंत विनायक पाटील यांच्याघरापासुन ते विमल नाजुकराव पाटील यांच्याषेताकडुन मागीरबुवा मंदीरा पर्यंत, सोमठाणा पांदन रस्ता, धोत्रा नाईक येथील शेख रफिक ते वर्दडा विहीर पर्यंत, अमडापुर ते डासाळा रस्ता, उत्रादा येथील बुलडाणा रस्त्यावरून रामेश्वर चतरसिंग यांच्या शेतापासुन ज्ञानदेव भिकाजी यंाच्या शेतापर्यत, एकलारा येथील देवीचे मंदिर ई क्लास ते आमखेड फाटा, करतवाडी येथील करतवाडी ते अषोक सपकाळ यांच्या शेतापर्यंत, किन्होळा येथील निलेष राजपुत ते मोतीराम खरात यांच्या शेतापर्यत चांधई,केळवद येथील आदित्य पाटील बुलडाणा रस्त्यावरून गणेष निकम यांच्या शेतापर्यत, चांडोळ ते ढंगापुर गाव जोडरस्ता, चांधई येथील सावजी शेत दामधरवाडी गाव जोड रस्ता, चिखला येथील इराळा रोड पासुन ते जुनी पांढरी तलावा पर्यंत, चिखली येथील पॉवरहाउस चिखली बुलडाणा जुन्यारोडवरून नितीन गुंजाळकर यांच्या शेतापर्यंत, जांब येथील कोटा पांदन रस्ता, टाकरखेड हेलगा ते अमडापुर गाव जोड रस्ता, डोंगरगांव येथील धुमाळ वाडी ते जनार्दन पंखुले यांच्या शेतापर्यंत, धानोरी येथील महादेव मंदिरापासुन ते समाधान हिवरकर यांच्या शेता पर्यंत या २५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचा समावेष आहे. असे माजी आमदार राहुलभाउ बोंद्र्रे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले असुन शेतक-यांच्या वरील रस्त्यांच्या समस्या मार्गी लागणार असल्या कारणाने शेतक-यांकडुन माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे व राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे आभार व्यकत करण्यात येत आहे.