खंडाळा मकरध्वज ते दिवठाणा रस्त्याचे रुदीकरण व डांबरीकरण करा – शेतकऱ्यांसह स्वाभिमानीची मागणी
MH 28 News Live, चिखली : खंडाळा मकलध्वज ते दिवठाणा या रस्त्याचे काही वर्षापुर्वी मातीकाम व खडीकरण करण्यात आले होते. परंतु ते काम अर्धवट अवस्थेत सोडुन देण्यात आल्याने या संपुर्ण रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यात शेतकऱ्यांना या रस्त्यावरुन शेतीच्या मशागतीसाठी व शेतमाल वाहतुकीसाठी अडचणी निर्माण होत असल्याने या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह खंडाळा मकरध्वज, अन्वी, बोरगाव वसु येथील शेतकरी यांनी दि. ४ मे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खंडाळा मकरध्वज ते दिवठाणा या रस्त्याचे मातीकाम अंदाजे दहा ते पंधरा वर्षापुर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने करण्यात आले होते.क्षत्यावेळी फक्त दिड ते दोन कि मी चेच खडीकरण काम करण्यात आले होते. तेव्हा ते काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले. आता या रस्त्याची खस्ता हालत झाली असून काही ठिकाणी झाडे झुडपे उगल्याने तर काही ठिकाणी रस्त्यावरील अतिक्रमणात वाढ झाल्याने हा रस्ता अरुंद झाला आहे. या रस्ताचा वापर शेतकरी शेती मशागत करणे आपला शेतमाल वाहतुक करणे यासाठी करतात. परंतु दोन चार वर्षापासुन पाऊस पडल्यावर या रस्त्यावरुण ये जाय करणे कठीण होते तर बैलगाडी, ट्रैक्टर व वाहतुक करणारे वाहणे चिखलात फसत असल्याने मोठी कसरत शेतकरी यांना करावी लागत आहे. या रस्त्याचे काम करण्यात यावे अशी ओरड शेतकरी अनेक दिवसांन पासुन करीत आहेत. मात्र या गंभीर समस्यांकडे संबंधीत प्रशासनाकडुन दुर्लक्ष होत असल्याने शेतकर्यानी आक्रमक पावित्रा घेतला आहे. दिवठाणा ते खंडाळा रस्त्याचे अर्धवट खडीकरण काम केल्याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अरुंद रस्ता रुदीकरण करुण संपुर्ण रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे,पावसाळ्यात शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात या रस्त्याचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये समावेश करण्यात यावा,अशी मागणी खंडाळा म, अन्वी,बोरगाव वसु येथील शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता जि प बांधकाम विभाग बुलडाणा, तहसिलदार, ठाणेदार यांच्याकडे केली आहे. या मागणीची पुर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर गजानन खेडेकर, विजय रुद्राक्ष, रामेश्वर पवार, विजय सुरडकर, नामदेव सपकाळ, प्रकाश डुकरे, आश्रुबा ठेंग, भगवान काकडे, भारत गाडेकर, गणपत गाडेकर, श्रीराम गाडेकर, भारत कदम, कडुबा भुतेकर यांच्यासह खंडाळा, दिवठाणा,बोरगाव वसु, अन्वी येथील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button