♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

वसंतराव नाईक विजाभज महामंडळामार्फत व्याज परतावा योजनेची अंमलबजावणी. वैयक्तिक कर्ज व गट कर्ज योजना व्याज परतावा योजनेचा समावेश

MH 28 News Live , बुलडाणा : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजनांचा समावेश आहे.

या योजनांसंदर्भात माहिती महामंडळाच्या vjnt.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच बिज भांडवल कर्ज योजना, थेट कर्ज योजना ही ऑफलाईन असून योजनेचे अर्ज विक्रीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे. अर्जाची किंमत 10 रूपये आहे. थेट कर्ज योजनेच्या अर्जासाठी आधार कार्ड, जातीचा दाखला व राशन कार्ड सोबत ठेवणे अनिवार्य आहे. तसेच ज्या अर्जदाराने व्यवसाया संबंधीत प्रशिक्षण प्राप्त केले आहे. त्यांना व विधवा, निराधार महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. पात्र इच्छूकांनी जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बुलडाणा येथे संपर्क करावा. कर्ज मागणीचे अर्ज केवळ अर्जदारालाच विक्री करण्यात येणार असून त्यांच्याकडूनच स्वीकारण्यात येणार आहे. मध्यस्थामार्फत अर्जाची विक्री होणार नाही. तसेच स्वीकारल्याही जाणार नाही. तसेच अधिक माहितीसाठी 07262-295319 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एच.जी आत्राम यांनी केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129