♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नागसेन बुद्ध विहार व सिद्धार्थ नगर बुद्ध विहारास डॉ. आंबेडकर पुतळ्याचे प्रशांत भटकर यांच्या कडून धम्मदान

MH 28 News Live, चिखली : वैशाखी पौर्णीमा तसेच बुद्ध पौर्णीमेचे औचित्य साधून शहरातील नागसेन बुद्ध विहार व सिध्दार्थ नगर बुध्दविहाराला कलाकथीत मातोश्री नलीनीबाई उदयराव भटकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे धम्मदान सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भटकर यांच्या वतीने करण्यात आले. याच कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना देखील गौरवण्यात आले.

नागसेन बुध्दविहारातील अनावरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. बी . साळवे तर प्रमुख वक्ते एल . आर . खरात हे होते. डि. व्ही. खरात यांनी सूत्रसंचालन केले आभार प्रदर्शन माजी प्राचार्य टि. एस. खरात यांनी केले.

सिद्धार्थ नगर बुद्ध विहारात कालकथीत वडील उदयराव लक्ष्मणराव भटकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याचे धम्मदान प्रशांत भटकर यांनी केले. सुप्रिया प्रशांत भटकर, बहीन अबोली, सतीश काळे, बहीन अनुराग अरविंद भिंगारे यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याच कार्यक्रमात लखनऊ येथे झालेल्या रशियन आर्मी गेम अंतर्गत फस्ट नॅशनल हॅन्ड टु हॅन्ड फायटींग कॉम्बो काँम्पेंटिशन शिप स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या संकेत जाधव, शुभम जाधव, सुमित खंडारे, सुशील जाधव कनिश बनसोडे मनिष गवई, लाऊरेन सिद्दीकी या विद्यार्थ्यांचा प्रशांत भटकर यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच इटली येथे कॉम्पीटीशन मध्ये सुशिल जाधव ‘ शुभम जाधव, सुमित खंडारे , संकेत जाधव यांची निवड झाली त्यांना प्रशांत भटकर यांनी ५०००(पाच हजार) रुपये उत्साह वाढवावा त्यांना इटली जाण्यासाठी मदत मिळावी करिता धनादेश देण्यात दिला.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129