
ज्येष्ठ स्वयंसेवक बाबुराव काकड निवर्तले
MH 28 News Live, सिंदखेडराजा:- सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पिंपळगाव बु. येथील बाबुराव रामजी काकड यांचे आज दि. २२ मे, रविवारी सकाळी ६. ०० वा. हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.
तीन दिवसांपूर्वी त्यांना औरंगाबाद येथील सिग्मा ह्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मृत्यूसमयी त्यांचे वय ८४ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या मृत्युमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सिंदखेडराजा मतदार संघातील प्रचंड हानी झाली असल्याचे भाजपा पदाधिकारी बोलताहेत.
आज सायंकाळी पिंपळगाव बु. येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यावेळी समाजातील सर्वच घटकातील जनसमुदाय उपस्थित होता.



