
ग्राम कव्हळा येथे तरुणांनी रक्तदानतून केले राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन. सरपंच रवींद्र डाळीमकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद
MH 28 News Live, चिखली : तालुक्यातील कव्हळा येथे राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मासाहेब व युवकांचे प्रेरणास्थान युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सावरखेड नजीक गावकऱ्यांच्या वतीने व बुलढाणा अर्बन ब्लड सेंटर बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर दि. १२ जानेवारी रोजी संपन्न झाले. सदर रक्तदान शिबीराला रवींद्र डाळीमकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील ४१ तरुणांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाची सुरुवात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे बाळकडू शिवरायना ज्यांच्याकडून मिळाले त्या माँ साहेब जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच रवींद्र डाळिंमकर, डॉ. सुरेश महाले, डॉ मारोती इंगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विकास डाळीमकर, ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद महाले, माजी सरपंच विकास कांडेकर, माजी सरपंच ज्ञानेश्वर भेरे, यांच्या हस्ते माँ जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करण्यात आले. या प्रसंगी सरपंच रवींद्र डाळीमकर यांनी माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्यकतृत्वावर प्रकाश टाकला.
शिबिरात दत्ता वाढेकर, गोपाल महाले, संदीप हराळ,, गणेश मानमोडे,शिवदास गाढवे, संदीप शेडगे, प्रभुनाथ सोनुने, उल्लासशिंग इंगळे, संदीप मोरे, गोपाल डाळीमकर, परमेश्वर डाळीमकर, भगवान गुंड, अमोल डाळीमकर, गोपाल गजानन डाळीमकर, ग्रामपंचायत सदस्य अनंता डाळीमकर, सागर डाळीमकर, अमोल हागोने,राम डाळीमकर, भागवत डाळीमकर, रामेश्वर इंगळे, गणेश शेडगे, अजय डाळीमकर, सागर साळोख, अमोल इंगळे, सिद्धेश्वर शेडगे, योगेश मोरे, वैभव मानमोडे, शुभम वामळे, ज्ञानेश्वर धवणे, राम निकस आदींनी रक्तदान केले.



